Monday, April 24, 2006

जत्रा

ह्या रविवारी मी खूप दिवसांनी एका जत्रेला गेलो !! लहानपणी आई-बाबांबरोबर चतु:श्रुंगी च्या जत्रेला जायचो त्यानंतर हीच. तोच गोंधळ, तीच गर्दी, धूळ .... मला खरच २५ पेक्षा जास्त लोक असलेल्या जागी घुसमटायला होते ... इथे तर हजारो लोक ....
रविवारची छान संध्याकाळ ... दुपारी मस्त डुलकी काढल्यावर अचानक आम्हाला "चला खरेदीला जाउया" अशिइ दुर्बुद्धि झाली... म्हणले चला ... जायचेच आहे तर "फोरम" लाच जाऊ .... मला ह्या मॉल प्रकाराबद्दल एकच आवडते म्हणजे सगळे एका ठिकाणी मिळते (त्यात एअर कंडीशन वगैरे) आणि वण-वण भटकावे लागत नाही. झक मारत बाईक वर निघालो ... सध्या महा-नगर-पलिके नी मुळातच उत्तम असलेल्या रस्त्यांवर ६ इंच टार चा थर देण्याचा जो कार्यक्रम चालवला आहे, त्याचा प्रसाद मिळाला !! अखेर पोहोचलो बुवा कसे बसे कोरमंगला मध्ये .... तिथे नविन साक्षात्कार झाला की पुर्वी-प्रमाणे रहेजा अर्केड ला आता पार्क करता येत नाही ... मग झक मारत फोरम च्या पार्किंग साठी रांगेत लागलो, तर ते ओवर-फ़ुल्ल .... कसे बसे त्याच्या दुसऱ्या पार्किंग मध्ये जागा मिळाली ... तिथे वट्ट १० रुपये (हे काय पार्किंग च्या पैशातुन रोज एक नवे दुकान उघडतात की काय ??) देऊन गाडी लावली .... बाहेर पडून बघतो तर काय ... फोरम देवाच्या जत्रेला ऊत आला होता ... सगळीकडे माणसेच माणसे ... मला तर अगदिच घुसमटायला झाले ... कसे बसे एका दरवाजामधून आत शिरून सरकत्या जिन्यापऱ्यन्त पोहोचलो ... तिथे पहिली हुशारीची गोष्ट केली आणि वर न जाता थेट दुसऱ्या दरवाज्यानी बाहेर आलो .... मी म्हणले चला ... सुटलो ... पण कसले काय न कसले काय ... प्रीति च्या दांडग्या उत्साहापुढे माझे काही चालले नाही ... फोरम देवाचे असे धावते दर्शन घेतल्यावर तिला "बिग बजार" चि जत्रा बघायचि हौस आली ... रस्त्यावरून चालत कसे बसे तिथे पोहोचलो तर एन्ट्रन्सलाच १०० एक माणसे !!! बाप-रे ... प्रीति ने खेचून आत नेले म्हणून गेलो ... त्या बिचाऱ्या बिग बजार च्या एअर कंडीशन ने पण एवढी गर्दी पाहून जीव टाकला होता ... घाम ... गर्दी ... कसेबसे प्रीति ला पटवून बाहेर काढले, गाडी काढली आणि ३० मिनिटे पार्किंग साठी १० रुपये मोजल्याची खंत बाळगत गप-गुमान घरी आलो.मधला रिंग रोड चा स्ट्रेच माझा बंगलोर मधील सर्वात आवडता रस्ता ... तिथे एरवी मी कधिही ७० च्या खाली येत नाही ... काल मात्र त्या घुसमटीतून बाहेर पडल्यावर रिंग रोड वरील ती मोकळी हवा फारच छान वाटली ... ३० च्या पुढे स्पीड जाईना !!!
परत येतान प्रीति म्हणलि ... उगच ह्या सगळ्या लोकांनी येऊन किती गर्दी केलिये बंगलोर मध्ये .... ती हे म्हणु शकते, पण मी ?? मी पण खरे तर ह्या शहरात येऊन गर्दीच तर करतो आहे ... माझ्या इथे येण्याने बंगलोर ला अथवा येथिल रहिवास्यांना काय फायदा झाला ?? का आलो आपण सगळे इथे आणि का टिकून आहोत ?? गर्दी करायला ???

1 Comments:

Blogger Ajit said...

kkay re ajuun tulaa devanaagarIt lihiNe jamalele disat naahi

4:41 PM  

Post a Comment

<< Home