लिहावेसे वाटले म्हणून ...

Friday, May 12, 2006

धुपाटणे ...

"आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमवायची तयारी असावी लागते" ... हे ही असेच कुठे तरी ऐकिवात आले ... विचार केला तर खऱय पण तितकेसे सोपे नाही. काय कमवण्यासाठी काय गमवतोय हे आधि कळायला तर पाहिजे ? कसे ठरवणार ? काहितरीच कमवण्यासाठी काहीच्या काही गमावणे हे वेडेपणाचे आहे ... गमवायची तयारी असण्यापेक्षाही हा नीर-क्षीर विवेक असणे जास्त महत्वाचे नाही का ? नाहीतर शेवटी तेलही जाईल, तूपही जाईल आणि नुसतेच धुपाटणे घेऊन बसण्याची वेळ येईल!!

Tuesday, May 02, 2006

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी

"साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" .... परवाच माझ्या एका मित्राच्या और्कूट वर ही ओळ वाचली आणि मनात विचार आला की बरेचदा ही ओळ एखाद्या महान माणसाची साधी राहणी अधोरेखित करण्यासाठी वापरली जाते ... हे तितकेसे बरोबर नाही. ह्या वाक्यातील महत्वाचा भाग "उच्च विचारसरणी" हा आहे, "साधी राहणी" हा नव्हे. एखाद्याचे विचार उच्च असतील आणि राहणी देखिल उच्च असेल तर तो मनुष्य साधी राहणी नाही म्हणून डावा तर ठरत नाही ना ? मला स्वत:ला तरी असा माणूस जास्त आवडेल ज्याचे विचार तर सुंदर आहेतच पण राहणीमान देखिल आकर्षक आहे ... का नसावे ??