Tuesday, May 02, 2006

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी

"साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" .... परवाच माझ्या एका मित्राच्या और्कूट वर ही ओळ वाचली आणि मनात विचार आला की बरेचदा ही ओळ एखाद्या महान माणसाची साधी राहणी अधोरेखित करण्यासाठी वापरली जाते ... हे तितकेसे बरोबर नाही. ह्या वाक्यातील महत्वाचा भाग "उच्च विचारसरणी" हा आहे, "साधी राहणी" हा नव्हे. एखाद्याचे विचार उच्च असतील आणि राहणी देखिल उच्च असेल तर तो मनुष्य साधी राहणी नाही म्हणून डावा तर ठरत नाही ना ? मला स्वत:ला तरी असा माणूस जास्त आवडेल ज्याचे विचार तर सुंदर आहेतच पण राहणीमान देखिल आकर्षक आहे ... का नसावे ??

3 Comments:

Blogger Sumedha said...

अगदी सहमत! अशी माणसं असतात की ज्यांचे सुंदर राहणीमान त्यांच्या विचारसरणीबद्दल वर वर पाहता शंका निर्माण करू शकते. पण जवळून ओळख झाली की त्यांच्या उच्च विचारसरणीची खात्री पटते आणि मग ती व्यक्‍ती खरी आवडायला लागते.

आकर्षक राहणीमान उच्च विचारसरणीच्या बदल्यात असू नये असाही या ओळीचा अर्थ लावता येईल....

10:10 PM  
Blogger Kaustubh said...

comment baddhal dhanyavaad. aapali aadhichi oLakh aahe ka ? tulaa maajhya blog cha patta kasa laagalaa ? mee hyaa blog vagaire prakaraNaat naviin aahe mhaNuun vichaarale. tujhaa blog vaachalaa ... chhaan aahe.

1:27 AM  
Blogger Sumedha said...

तुझा ब्लॉग इथून मिळाला:
http://marathiblogs.net/

सगळे जुने नवे मराठी ब्लॉग्स इथे मिळतील, धमाल कर (enjoy ;-))

12:29 PM  

Post a Comment

<< Home