Friday, May 12, 2006

धुपाटणे ...

"आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमवायची तयारी असावी लागते" ... हे ही असेच कुठे तरी ऐकिवात आले ... विचार केला तर खऱय पण तितकेसे सोपे नाही. काय कमवण्यासाठी काय गमवतोय हे आधि कळायला तर पाहिजे ? कसे ठरवणार ? काहितरीच कमवण्यासाठी काहीच्या काही गमावणे हे वेडेपणाचे आहे ... गमवायची तयारी असण्यापेक्षाही हा नीर-क्षीर विवेक असणे जास्त महत्वाचे नाही का ? नाहीतर शेवटी तेलही जाईल, तूपही जाईल आणि नुसतेच धुपाटणे घेऊन बसण्याची वेळ येईल!!

1 Comments:

Blogger Y3 said...

तंतोतंत पटलं...!
आमची परिस्थिती काही अंशी अशीच आहे सध्या...
"नीरक्षीरविवेकेतु बको बक: ह्न्सो हन्स: !"
हे आठवल एक्दम... आणि हातात धुपाटण घेतलेला बगळा डोळ्यासमोर उभा राहिला..:)

9:13 PM  

Post a Comment

<< Home